महाराष्ट्र

तेल्हारा येथे सार्वजनिक मैत्रेय वाचनालयात…

*

*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे

तेल्हारा तालुका प्रतिनिध

तेल्हारा येथील आदर्श ग्रंथालय पुरस्कार प्राप्त सार्वजनिक मैत्रेय वाचनालयात दि.23 ला जागतिक ग्रंथदिन असल्यामुळे हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमीत्त्याने ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले होते.या ग्रंथदिनी कार्यक्रमाचे अध्यक्ष भिमराव वानखडे हे होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.आंबेडकर व डॉ.एस.आर. रंगनाथन या महापुरुषांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. व कवि शिवराजे जामोदे यानी फित कापून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर अली यांनी केले. यावेळी कवि शिवराजे जामोदे व ग्रंथमित्र रामेश्वर पोहेकर यांनी काव्य स्वरुपात मानवी जीवनात पुस्तकाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाला कर्मचारी अर्चना पोहेकर, जया दामोदर, काविता गव्हांदे तसेच स्पर्धा परिक्षा अभ्यासिकेचे विद्यार्थी विद्यार्थीनी, वाचक, सभासद आनंद बोदडे तथा ग्रंथप्रेमी आदिंची उपस्थिती होती. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथपाल रामेश्वर पोहेकर यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button