महाराष्ट्रविदर्भ

सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या मागणीला यश

पातुर तालुका प्रतिनिधी

सुखलाल उपर्वट

(अखेर फुटलेली पाइपलाइन दुरुस्ती करण्याचे काम सुरू )

अकोला प्रती – राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या हलगर्जीपणामुळे वार्ड क्रमांक १८ मधिल
नागरीक पाण्यापासून वंचित राहत होते सदर प्रकरण असे की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या
वतीने वाशिम बाय पास रोड वर पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे हे काम करत असताना
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या हलगर्जीपणामुळे महानगरपालिकेची नळाची पाईप लाईन दोन तिन
ठिकाणी फुटली असुन पिण्याचे पाणी पुर्णपणे वाया जात असून तिन दिवसांपासून वार्ड क्रमांक १८ मधिल
नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या
कर्मचाऱ्यांनी जागोजागी मोठ मोठे खड्डे खोदून ठेवलेले आहेत यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी
नाहक त्रास सहन करावा लागत आहे यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी
रितसर तक्रार केली असुन तिन दिवसांपासून बंद असलेले काम लवकरात लवकर सुरू करुन नळाची
फुटलेली पाइपलाइन दुरुस्ती करण्याची मागणी केली होती सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीची दखल घेत सदर फुटलेली पाइपलाइन दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे यामुळे उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीला यश आले असून नागरिकांनी उमेश सुरेशराव इंगळे यांचे आभार मानले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button