तेल्हारा येथे सार्वजनिक मैत्रेय वाचनालयामध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी

**स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसविजय घोडे तेल्हारा ता. प्रतिनिधी तेल्हारा. सार्वजनिक मैत्रेय वाचनालय तेल्हारा येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी साजरी करण्यात आली.तेल्हारा येथील प्रसिद्ध सार्वजनिक मैत्रेय वाचनालयामध्ये दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी बोधिसत्व, भारतरत्न ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रंथमित्र रामेश्वर पोहेकर गुरुजी हे होते तसेच कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ मित्र रामेश्वर पोहेकर गुरुजी यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने केली तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्वांकडून अभिवादन करण्यात आले .ग्रंथमित्र रामेश्वर पोहेकर गुरुजी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनात केलेल्या त्यागाबद्दल माहिती दिली तसेच समाजासाठी त्यांनी केलेले कार्य अमूल्य आहे हेही त्यांनी या प्रसंगी सांगितले तसेच या गोष्टीची जाणीव आपण ठेवावी असेही ते म्हणाले त्यांनी “ग्रंथालयात तुम्ही बसून पाहा” या कवितेद्वारे ग्रंथालयाचे महत्व काय आहे हे स्पष्ट केले.कार्यक्रमा मध्ये अक्रम बेग यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनात केलेले कार्य सांगितले तसेच विनय साबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलां करिताही खूप चांगल्या तरतुदी केलेल्या आहेत असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले पोहेकर गुरुजी यांचे चिरंजीव यांनी इंग्रजी मध्ये भाषण देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी ज्या गोष्टी करून ठेवल्या आहेत आपल्याजवळ जे काही वैभव आहे हे सर्व त्यांच्यामुळे आहे आपण हे विसरता कामा नये असे त्यांनी स्पष्ट केले. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्याने सार्वजनिक मैत्रेय वाचनालयामध्ये एक दिवसीय 18 तास अभ्यास अभियान उपक्रम राबविण्यात आला होता कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन सतीश बिहाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शुभम अवताडे यांनी केले तसेच कार्यक्रमांमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे अभ्यासिकेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते या कार्यक्रमाला शुभम अवताडे, रुपेश वाकोडे, अमिर मिर्झा ,स्वप्नील बोदडे ,अमोल आकोटकर ,विनय हिवराळे ,समीर,सतीश बिहाडे, गणेश बिहाडे ,मस्तूद , चव्हाण,गावंडे,ताई आदिंची उपस्थिती होती



