भिंत कोसळून मुलीचा मृत्यू,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी श्याम पहुरकर
मौजे काटेल (धाम) येथे 7 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास अचानक अवकाळी वादळ आल्याने, कवेलू मातीच्या घराची भिंत कोसळून, 2 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तर एक मुलगी जखमी झाल्याची घटना घडली आहे.
संग्रामपूर तालुक्यातील काटेल (धाम) येथे 7 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान अचानक जोऱ्याचा वादळवारा आल्याने गणेश रमेश बोरवार यांच्या कवेलू व मातीचे घराचे भिंत कोसळून यामध्ये त्यांची 2 वर्षीय मुलगी कृष्णाली बोरवार हिचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी मुलगी राधा गणेश
बोरवार ही जखमी झाली. सदर घटनेची माहिती मिळताच काटेलचे पोलिस पाटील एस.एम. देऊळकार, उपसरपंच, सदस्य सुनील पवार आणि कोतवाल यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेचा पंचनामा तहसीलदार संग्रामपूर यांना सादर केला. त्यानंतर मंडळ अधिकारी बुरजे पाटील व तलाठी गाढे यांनी भेट दिली. मृतक मुलीचे प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल) येथे दाखल केले. तर जखमी राधा गणेश बोरकर हिच्यावर उपचार सुरू आहेत. सदर घटनेची फिर्याद तामगाव पोलिस स्टेशनला दिली असल्याचे समजते.



