६ अर्ज नामंजूर

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या ३० एप्रिल रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकसाठी इच्छुक ११२ मेदवारांनी अर्ज दाखल केले होते. ५ एप्रिल रोजी दाखल अर्जांची छाननी करण्यात आली. गमध्ये १०६ अर्ज मंजूर तर ६ उमेदवारांचे अर्ज निवडणूक निणय अधिकारी बी. एन. कोल्हे यांनी नामंजूर केले. मंजूर अजीमध्ये | सहकारी संस्था मतदारसंघात आता एकूण ५९, ग्रामपंचायत मतदार संघामध्ये एकूण ३५, व्यापारी अडते मतदारसंघात ७, हमाल मापारी नतदारसंघासाठी ५ असे एकूण १०६ अर्ज मंजूर झाले आहेत. तसेच नामंजूर करण्यात झालेल्या अजीमध्ये पुष्पाताई सुनील गव्हांदे अनुसूचित जाती जमाती, ग्रामपंचायत मतदार संघ, विजय गजानन माळी ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण, तर बाजार समितीचे माजी सभापती गोविंदराव गणपतराव मिरगे यांचा सहकारी सोसायटी मतदार संघातील सर्वसाधारण व इतर मागास प्रवर्ग अशा दोन्ही जागेसाठी दाखल केलेले अर्ज, निवृत्ती दामभाऊ लांजुळकार यांचा सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण जागेसाठीचा अर्ज नसे एकूण ६ जणांचे अजींचा समावेश आहे.




