माटरगाव बुद्रुक येथे हरभरा खरेदीचा शुभारंभ

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरयेथील कृषि उत्पन्न बाजार समिती व महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने उपबाजार समिती माटरगाव बुद्रुक येथे २५ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत हरभरा खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. बाजार समितीचे प्रशासक बी. एन. कोल्हे, सचिव विलास पुंडकर व खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक मनोहर ताठे यांची प्रमुख उपस्थिती होती.केंद्रावर हरभरा विक्रीसाठी आलेले शेतकरी राजू जयस्वाल (रा. भोनगाव), प्रकाश निंबाळकर (रा. पहूरपुर्णा) व माजी सभापती गजानन भटकर यांचा प्रशासक कोल्हे, सचिव पुंडकर व सहाय्यक सचिव विनोद पुंडकर यांनी सत्कार केला. यावेळी बाजार समितीचे लेखापाल अनंत शेगोकार, आहे.निरीक्षक नागोराव डाबेराव, लिपिक दीपक कडाळे, मंडी ऑनालिस्ट रितेश मेटांगे, शिपाई प्रशांत घोडेराव, रियाजउल्ला खा अतउल्ला खा, रवी सोनोने यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. बाजार समितीने उपबाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांसाठी पाणपोई, शेतमाल मोजण्यासाठी ओटा, इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे, सीसीटीव्ही कॅमेरे, रात्रीला प्रशस्त विद्युत व्यवस्था, आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या केंद्रावर जवळपास १५०० शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली असून जवळपास दैनंदिन एक हजार क्विंटल शेतमाल मोजण्याचे बाजार समितीचे नियोजन आहे. बाजार समितीचा एसएमएस आल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला शेतमाल उपबाजार समितीच्या नाफेड केंद्रावर विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव विलास पुंडकर यांनी केले



