महाराष्ट्रविदर्भ
अनोळखी इसमाची रेल्वेतून पडून मृत्यू

अनोळखी इसमाची रेल्वेतून पडून मृत्यू
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर जलंब. रेल्वेतून पडून एका ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाला असल्याची घटना १४ मार्च रोजी जलंब- नांदुरा लोहमार्गीवर लांजुळ शिवारात घडली.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत वृत्त असे की जलंब ते नांदुरा रेल मार्गावर किमी. ५३०/१६ मध्ये लांजुळ शिवारात डाऊन लाईनवर रेल्वेतून पडून एका ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे अशी फिर्याद स्टेशन प्रबंधक बाघ जलंब यांच्यामार्फत शैलेश कुमार शिवलाल ठाकूर ट्रॅकमनमानी जलंब पोस्टेला दिली. पोलिसांनी मर्ग नंबर ०५/१७४ जाफ ७४ अन् केला आहे. पुढील तपास बीट जमदार दिनकर तिडके हे करीत आहेत.



