खानदेशजळगावा जिल्हाभुसावळमहाराष्ट्र

फसवणुकीतील एक लाख रुपये परत मिळवून दिल्याबद्दल पोलीस कर्मचाऱ्याचा सत्कार

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – फसवणुकीच्या प्रकरणात तक्रारदाराचे एक लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी तत्परतेने पाठपुरावा केल्याबद्दल डीबी पथकातील कर्मचारी चंद्रकांत रायपूरकर यांचा तक्रारदार सलीम हबीब पटेल यांनी पोलिस ठाण्यात सत्कार करून आभार मानले.

काझी प्लॉट परिसरातील रहिवासी सलीम हबीब पटेल यांची फसवणूक झाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर डीबी कर्मचारी चंद्रकांत रायपूरकर यांनी तक्रारदारासोबत जाऊन संपूर्ण हकीकत जाणून घेतली.

त्यानंतर रायपूरकर यांनी संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा करत तक्रारदाराचे एक लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन तक्रारदाराची रक्कम परत मिळाली.

रक्कम परत मिळाल्यानंतर सलीम हबीब पटेल यांनी पोलिस ठाण्यात उपस्थित राहून पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या समक्ष डीबी कर्मचारी चंद्रकांत रायपूरकर यांचा सत्कार केला. तसेच त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल रायपूरकर यांचे आभार मानले.

पोलिस कर्मचाऱ्याने तक्रारदाराची व्यथा समजून घेत तत्परतेने केलेल्या पाठपुराव्यामुळे फसवणुकीतील रक्कम परत मिळाल्याने तक्रारदाराने समाधान व्यक्त केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button