शेगावमध्ये नगर पालिकेचे दुर्लक्ष नागरिकाच्या आरोग्य धोक्यात

शेगावमध्ये नगर पालिकेचे दुर्लक्ष नागरिकाच्या आरोग्य धोक्यात
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसशेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकरस्थानिक नगर पालिकेच्या दुर्लक्षित कारभारामुळे घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी लाखो रुपये दिले जात असतानाही कंत्राटदाराकडून स्वच्छतेची कामे केली जात नसल्याचे दिसत आहे. या प्रकारामुळे शहरात अनेक ठिकाणी घाण, कचरा आणि सांडपाणी साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेतील प्रशासकीय अधिकारीही या निधीच्या गैरवापरात सहभागी असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे या समस्येला कोण वाचा फोडणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.शहरातील विविध भागात कचऱ्याचे ढिग साचले आहेत. मात्र, पालिकेकडून साफसफाईकडे दुर्लक्ष होत आहे. शहरातील मुख्य रस्ता तसेच विविध प्रभागातील रस्त्यावरील कचरा उचलण्यात येत नाही. तसेच रस्त्यालगत असलेल्या नाल्यांची सफाई करण्यात येत नाही. त्यामुळे त्यातही कचरा साचला आहे. नाल्यांमध्ये घाण आणि सांडपाणीसाचल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संपूर्ण शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नगर पालिकेची असतानाही या जबाबदारीकडे प्रशासकीय विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. नियमित स्वच्छता व नालेसफाई होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.शहरातील श्रीराम नगरात पाण्याचा मुख्य जलकुंभ आहे. या जलकुंभाच्या थोड्या अंतरावरच पाणीपुरवठा करणाऱ्या नळाची पाईपलाईनला गळतीलागली आहे. जलकुंभातून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो, त्यावेळी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनला गळती असल्यामुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावर साचून चिखल साचतो आणि नाल्यांमधून पाणी वाहून जाते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामधूनच नागरिकांना वाट काढत जावे लागते. या गंभीर समस्येबाबत परिसरातील नागरिकांनी वारंवार प्रशासकीय विभागाला माहिती देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.



