रावेर पंचायत समितीने गुन्हा दाखल असलेले ग्रामसेवकच ठरविले आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी पात्र

रावेर पंचायत समितीने गुन्हा दाखल असलेले ग्रामसेवकच ठरविले आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी पात्र
रावेर दि.27
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा परिषदेने शासन निर्णया नुसार सन २०१५ पासून ते सन २०२२ पर्यंत उत्कृष्ठ काम करणाऱ्या ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्यासाठी पंचायत समित्यांना प्रस्ताव मागविले होते ; प्रस्तावाबाबत शासनाच्या काही मार्गदर्शक सूचना आहेत ; मात्र पंचायत समिती रावेर येथील विस्तार अधिकारी ( ग्रा . प) व गट विकास अधिकारी यांनी शासनाच्या सूचना आणि निकष धाब्यावर बसवून गेल्या वर्षी जुलै २०२२ मध्ये रावेर न्यायालयाच्या आदेशाने तालुका अंतर्गत बदलीतून सूट मिळविल्या प्रकरणी रावेर पोलिसांत गुन्हा दाखल असलेले ग्रामसेवक रवींद्रकुमार चौधरी, शामकुमार पाटील, सौ छाया रमेश नेमाडे , शिवाजी गुलाबराव सोनवणे आणि राहुल रमेश लोखंडे यांचेच प्रस्ताव रावेर पंचायत समितीने पाठविल्याचे तक्रारदार किशोर भिवा तायडे यांचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि प जळगांव यांचेकडे तक्रार दाखल केली आहे.गुन्हा दाखल असलेले आणि सध्या जमीनावर बाहेर असलेल्या ग्रामसेवकांचे पुरस्कार जिल्हा परिषदेने रद्द न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा किशोर तायडे यांनी दिला आहे.



