उन्हामुळे संत नगरी शेगाव येथील आठवडी बाजार मंदावला. बाजारात गिर्हाईकांची गर्दी पडली कमी*

*उन्हामुळे संत नगरी शेगाव येथील आठवडी बाजार मंदावला. बाजारात गिर्हाईकांची गर्दी पडली कमी*
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव
प्रतिनिधी श्याम पहुरकर
मंगळवार दिवशी संत नगरी शेगाव येथील आठवडी बाजार असतो. दिवसेंदिवस वाढत असलेल्या उन्हामुळे आठवडी बाजारात एकदम अचानक गिऱ्हाईकांची गर्दी कमी झाल्यामुळे बाजारातील बेकार्यांजवळची दुकान सुनसुनी वाटायला लागली आहेत. बाजारातील टमाटे. वांगी. आलू. मिरची. भेंडी. हिरवे पालेभाज्या. ग्राहकांअभावी तशाच दुकानावर पडून आहेत. फळविक्रेत्यांकडे सुद्धा गीरेकांची गर्दी कमी झालेली दिसत आहे. चिवड्या वाले व जिलेबी वाल्यांकडे गिराई की कमी असल्यामुळे त्या दुकानांवर चिवडा. जिलेबी. बालुशाही. मैसूर पाक. व इतर फरसाण चे विक्रेत्यांकडे गंज चे गंज च पडून आहेत. बाजारात गिऱ्हाईकांची कमतरता असल्यामुळे मंगळवारचा भरलेला आठवडी बाजार हा इतरत्र दिवसांप्रमाणेच खाली खाली भासत आहे. बाजारात फक्त बेपारी व फळभाजी विक्रेत्यांची च गर्दी दिसून येत आहे. ग्राहक मात्र तुरळक झालेले आहेत.



