Uncategorized

आसलगाव ते आडोळ फाटा जिल्हा महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगाव जामोद सदर महामार्ग 18 मीटर रुंद असल्याकारणाने असलगाव परिसरात अनेक ठिकाणी अतिक्रमणे असल्याने अतिक्रमण काढल्याशिवाय रस्ता कामाला सुरुवात होणे कठीण आहे. या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जामोद यांच्यावतीने चौक पोलीस बंदोबस्तात महसूल विभाग यांच्या सहकार्याने शाखा अभियंता निलेश भेलके यांच्या यांच्या उपस्थितीत अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दोन दिवसात आसलगाव रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याचे काम पूर्ण तत्त्वास येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. यावेळी जळगाव जामोद तहसीलदार शितल सोलाट ठाणेदार आनंद महाजन व सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा अभियंता निलेश भेलके व त्यांची टीम व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पडशी सुपो मोहिदेपूर या गावातील मुख्य रस्त्यावरील 18 मीटर च्या आत अतिक्रमणे काढून प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा अभियंता निलेश भेलके यांनी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस च्या माध्यमातून गावकऱ्यांना आवाहन केले आहे स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस करिता हरिदास इंदोरे जळगाव जामोद

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button