महाराष्ट्रविदर्भ

आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा

आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव

प्रतिनिधी श्याम पहुरकर वरवट बकाल

: केंद्र व राज्य सरकारने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव पाडल्याने २२ फेब्रुवारी रोजी वरवट बकाल येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय ठाकरे यांनी तहसीलदार यांच्यामार्फत राज्यपाल यांना देण्यात आला.कापूस – सोयाबीन भाववाढ, बोंडअळीमुक्त कपाशी बियाणे, शेतमजुरांसाठी स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ, रखडलेली अतिवृष्टीची नुकसान भरपाई, विमा कंपनीने रोखलेला पीकविमा, कृषी पंपाला दिवसा वीज व कृषी कनेक्शनवर वाढलेला लोड समतोलसाठी नवीन रोहित्र वाढवणे, उसाला एकरकमी एफआरपी,वरवट बकाल : निवेदन देताना शेतकरी.प्रोत्साहनपर अनुदानाची थकित रक्कम, नाफेडमार्फत शासकीय कांदा खरेदी सुरू करावी, बुलढाणा येथे आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा, या मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावरउतरणार आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मोहन खंडेराव पाटील, राजू उमाळे, विलास तराळे, अनुप देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बहुसंख्य

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button