महाराष्ट्रविदर्भसामाजिक

मेडशी येथील श्री नागनाथ महादेव संस्थानवर महाशिवरात्री मोठ्या उत्सवात साजरी
,शिवलिंगाच्या दर्शनासाठीभाविकांचा जनसागर उसळला,
,भाविकांना फराळाचे वाटप ,

मेडशी येथील श्री नागनाथ महादेव संस्थानवर महाशिवरात्री मोठ्या उत्सवात साजरी
,शिवलिंगाच्या दर्शनासाठीभाविकांचा जनसागर उसळला,
,भाविकांना फराळाचे वाटप ,

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव :- देवांचे देव तिन्ही लोकांचे स्वामी महादेवाचा हा सर्वात मोठा उत्सव असून माघ कृष्ण चतुर्दशी ही तीथी महाशिवरात्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसावर मेडशी येथील १ किलोमीटर अंतरावर वसलेले शिवकालीन हेमाडपंथी नागनाथ महादेव संस्थान वर महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. उत्सवा निमित्त नागनाथ संस्थांवर, दर्शनासाठी व पूजेसाठी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
भक्तांनी आपल्या सोई नुसार मंदिरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले व आराधना केली. हर हर महादेवाच्या जय घोषाने परिसर दणाणला असून आज सकाळी शिवलिंगास दुग्धाभिषेक करण्यात आला नंतर महाआरती करून शिवभक्तांची दर्शनाकरिता सकाळपासून शिवभक्तांची,मांदियाळी सुरू होती यादरम्यान विविध क्षेत्रातील शिवभक्तांना नागनाथ मित्र मंडळाच्या वतीने फराळांचे वाटप करण्यात आले या करिता नागनाथ मित्र मंडळाच्या सदस्यांनी, सहकार्य करून शांतता राखण्यास मदत केली संस्थांवर येणाऱ्या भाविकांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सह ये- जा करण्याकरिता वाहनांची व्यवस्था संस्थांच्या वतीने चोखपणे ठेवण्यात आली होती नागनाथ महादेव मंदिर परिसर आकर्षक सजावट व रोषणाईने सुंदर सजविण्यात आले होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button