महाराष्ट्रविदर्भशेती

विहिरीत पडून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

अजय गायकवाड मालेगांव :

17 फेब्रुवारीमालेगाव शहरात राहणाऱ्या 65 वर्षीय शेतकऱ्याचा 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास अमानी शेत शिवारातील शेतात सिंचनासाठी मोटार पंप सुरू करताना पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.घटनेची माहिती अशी की, धमधमी तालुका मालेगाव येथील राहणारे वासुदेव कोंडूजी वाळले वय 65 हे मालेगाव येथील मालवी नावाच्या शेतकऱ्याच्या अमानी शेत शिवारातील शेत बटाईने वाहत होते.16 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता वासुदेव वाळले शेतात सिंचनासाठी मोटार पंप सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना पाय घसरून विहीरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. याच दरम्यान पाय घसरल्याने विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती उडी गांवचे सरपंच रणजित घुगे यांनी फोनवर धमधमी येथील मृतकाचे चुलत भावास तसेच मालेगाव पोलीस ठाण्यात दिल्यानंतर धमधमी येथून मृतकाचे कुटुंबीय व पोलीस निरीक्षक गजानन तडसे घटनास्थळी पोहोचले. विहिरीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. सदर प्रकरणी मृतकाचे चुलत भाऊ केशव आत्माराम वाळले वय 40 वर्षे राहणार धमधमी यांनी 16 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता फिर्याद दाखल केल्यानंतर मालेगाव पोलिस स्टेशन मध्ये मर्ग क्रमांक 09 / 2023 नोंदवून फौजदारी संहितेच्या कलम 174 नुसार प्रकरण दाखल करण्यात आले आहे. वरील प्रकरणाचा तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश बियाणी करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button