शिवजयंती निमित्त मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिर संपन्न..

.वाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाड
मालेगांव : – श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मालेगांव तालुक्यातील पंगरी नवघरे येथील विश्राम महाराज मंदिर येथे सार्वजनिक शिव जयंती सोहळा समिती पांगरी नवघरे आणि हिंदवी परिवार मालेगांव तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिराचे आज दिनांक 18 फेब्रुवारी शनिवार रोजी संपन्न झाले असून जवळपास 100 लोकांनी याचा लाभ घेतला मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिरा करिता वाशिम येथील सुप्रसिद्ध नेत्ररोग व नासुर तज्ञ डॉ मनीष पावसे, हृदयरोग छाती मधुमेह मेंदूरोग पोटविकार तज्ञ डॉ अतुल काळूशे तसेच मालेगांव येथील सुप्रसिध्द बालरोग तज्ञ डॉ पुरुषोत्तम देवळे, मूळव्याध तज्ञ डॉ राजेश दळवे दंत रोग तज्ञ डॉ ईश्वर धूत जनरल फिजिशियन डॉ अश्विन काटेकर डॉ राजाभाऊ घुगे आणि डॉ ओंकार शेटे डॉ विजय नवघरे हे उपस्तीत झाले होते या शिबिरामध्ये ब्लड शुगर,इ सी जी हिमोग्लोबिन आणि रक्त गट तपासणी करण्यात आली या शिबिराला संतोष जाधव दिलीप नरवाडे विजय मानवतकर प्रदीप राजोरीया संतोष शेटे उपस्तीत होते या शिबिरासाठी हिंदवी परिवार व सार्वजनिक शिवजयंती सोहळा समितीच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.



