अकोलाबुलढाणामहाराष्ट्र

तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात सेंट पॉल्स अकॅडमीची दमदार कामगिरी

हिवरखेड | प्रतिनिधी

तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात सेंट पॉल्स अकॅडमी, हिवरखेडच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. या यशामुळे सेंट पॉल्स अकॅडमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या मेळाव्यातील दोन्ही स्पर्धांमध्ये सेंट पॉल्स अकॅडमीने प्रथम क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थिनी अस्मिता हागे हिने प्रथम क्रमांक मिळवत उत्कृष्ट वक्तृत्व आणि आत्मविश्वासाचे प्रदर्शन केले.

तसेच नाट्य स्पर्धेत इयत्ता ८वी, ९वी आणि १०वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत प्रभावी सादरीकरण केले आणि या स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि मार्गदर्शक शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे ठरले.

या स्पर्धेचे परीक्षण डॉ. रविंद्र भास्कर (जिल्हाध्यक्ष, विद्यार्थी विज्ञान मेळावा), सौ. आशा भास्कर, एम. के. इसाक (परीक्षक व सेवानिवृत्त विज्ञान शिक्षक), सौ. पद्मावती टिकार (परीक्षक व माजी मुख्याध्यापिका) तसेच, तालुकाध्यक्ष विज्ञान मंडळ श्री. विलासराव घुंगड सर यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचा आयोजन करण्यात आलं होतं यांनी केले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मार्गदर्शक शिक्षक दही सर आणि येलुकर मॅडम यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष नवनीत लाखोटिया, सचिव प्रमोद चांडक, मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी आणि उपमुख्याध्यापिका निमिता गांधी यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

सेंट पॉल्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश संपूर्ण शाळा परिवारासाठी अभिमानाचा क्षण ठरले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button