परमपूज्य आचार्य श्री १०८ विराग सागर महाराज यांचे देव मूर्ती येथे समाधी मरण,जैन समाज शोकमग्न

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – परमपूज्य राष्ट्रसंत आचार्य भारत गौरव गणाचार्य श्री १०८ विराग सागरजी महाराज यांचा कारंजा येथून मालेगाव शिरपूर कडे मंगल विहार झाला होता.मालेगावमध्ये त्यांच्या आगमनामुळे समाजात तसेच भाविक भक्तांना आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते परंतु,त्यांना मालेगावातून विहार करून आठ दिवस झाले असता,जालना जवळ तीन किलोमीटर अंतरावर देव मूर्ती या गावात,मध्यरात्री अडीच वाजता त्यांचे समाधी मरण झाले.आचार्य श्रींच्या या समाधी मरणाने सकल दिगंबर जैन समाजावर दु:खाची लाट पसरली आहे त्यांच्या संघातील शिष्यांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे देव मूर्ती या गावात,गुरुवार म्हणजे गुरुचा वार या दिवशीच त्यांचे समाधी मरण झाले. यावेळी अखिल भारतीय दिगंबर जैन समाजाचे असंख्य लोक त्यांच्या अंत्यविधीसाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित होते.पाटणी परिवाराने त्यांचे दोन एकर शेत गुरु मंदिरासाठी दान दिले आहे,जिथे भव्य दिव्य गुरु मंदिर उभारण्यात येणार आहे.आचार्य गुरुदेवांनी आपल्या शिष्यांना “जुडो और जुडने दो,मिलो और मिलने दो” अशी घोषणा दिली होती.त्यांनी आपल्या संघातील सर्व शिष्यांची काळजी घेऊन प्रत्येकाशी प्रेम,दया आणि वात्सल्याने वागण्याचे आपले कर्तव्य पूर्ण केले.त्यांनी सर्व भक्तांना समान पद्धतीने आशीर्वाद दिले आणि त्यांच्या मनात वात्सल्य भावना उत्पन्न केली.आचार्य गुरुदेवांनी अंदाजे ५०० जणांना दीक्षा दिली होती, आचार्य श्री विराग सागरजी महाराज यांची दीक्षा संभाजीनगर येथे झाली होती. त्यांच्या समाधी मरणामुळे देव मूर्ती गावही एक विशेष गाव बनले आहे.देव मूर्ती हे गाव जालना जिल्ह्यात स्थित आहे.विराग सागरजी महाराज यांचे नाव ‘विराग’ असले तरी,त्यांचा राग अद्यापही कधी संघामध्ये दिसला नाही.श्रमण मुनी श्री १०८ विशेष सागर जी महाराज यांनी आचार्य गुरुदेव विराग सागर जी महामुनी राज यांना महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील धर्मतीर्थ पुसेगाव येथे भव्य दिव्य ५१ फुटांची भगवान बाहुबली पाषाणाची मूर्ती विराजमान असून,त्यांच्या पंचकल्याणक कार्यक्रमासाठी आचार्य गुरुदेव विराग सागरजी महाराज यांच्या सानिध्यात पंचकल्याणक करण्याचे आवाहन केले होते. महाराष्ट्रातील सर्व भाविक भक्तांनी त्यांना निमंत्रण दिले होते,परंतु ते स्वप्न अधुरे राहिले. आचार्य श्रींनी समाधी मरणाच्या आधी सर्वांना क्षमा मागितली व सर्वांना क्षमाही केली,
रविवार,दिनांक ७ जुलै रोजी आचार्य गुरुदेव भारत गौरव राष्ट्रसंत गणाचार्य उपसर्ग विजेता श्री १०८ विराग सागर जी महाराज यांची सामूहिक विनयांजली ठीक ठिकाणी गावामध्ये ठेवण्यात आली आहे.



