जळगावा जिल्हाजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

शाडू मातीच्या गणेशमूर्तींतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; जे. ई. स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त सहभाग

मुक्ताईनगर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासोबतच सार्वजनिक शिस्त, स्वच्छता आणि कायदे-सुव्यवस्थेचे भान विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने जे. ई. स्कूल, मुक्ताईनगर येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

प्रसिद्ध मूर्तिकार शिवम अनूप सुतार यांनी विद्यार्थ्यांसमोर शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. मूर्ती निर्मितीची पद्धत, तिचे बारकावे आणि पर्यावरणपूरक मूर्तीचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती तयार केल्या.

कार्यशाळेला संस्थेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे, संचालक रमेश खाचणेमहेशदादा पाटील यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची पाहणी केली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मूर्तींची घरी स्थापना करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असला, तरी उत्सवाच्या काळात पर्यावरण, सार्वजनिक स्वच्छता आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळणे, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करणे, विसर्जनाच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी शिस्त राखणे तसेच ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवामुळे केवळ जलप्रदूषणाचा प्रश्न कमी होत नाही, तर उत्सव अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार पद्धतीने साजरा करण्यासही हातभार लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांपासूनच पर्यावरण आणि कायदे-सुव्यवस्थेची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

यावेळी शाळेचे प्राचार्य विकास चौधरी सर, उपमुख्याध्यापिका वंदना शिर्के मॅडम, पर्यवेक्षक विलास बऱ्हाटे सर, कैलास कव्हळे सरसंजीव वाढे सर उपस्थित होते.

कार्यशाळेचे आयोजन कलाशिक्षक हेमंतकुमार बाऊस्कर, अर्चना भोळे मॅडममनोज सुरवाडे सर यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

कला, संस्कृती, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम घडविणारी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. ‘पर्यावरण वाचवा, नियम पाळा आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा करा’ हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button