बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

जि. प. केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- प्रशांत चव्हाण
बुलढाणा :- (दि15 ऑगस्ट) जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा, पिंपळगाव काळे येथे भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.
मागच्या वर्षी घेण्यात आलेल्या मंथन परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
याचप्रमाणे लीडर माता माता-पालक सत्कार समारंभही घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या पालकांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना देशप्रेम, शिस्त व शिक्षणाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट व चॉकलेट देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली,

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button