बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ६७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत श्री समर्थ हॉस्पिटल व गणराज मेडिकल, सातेफळ रोड, देऊळगाव राजा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल ६७ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सामाजिक हक्क व कर्तव्य बजावले.

“रक्तदान हेच श्रेष्ठदान” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात युवकांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिराचे आयोजन डॉ. पंकज धोंडरकर (श्री समर्थ हॉस्पिटल), नितेश राठोड व विशाल राठोड (गणराज मेडिकल), सूरज बल्लाळ (मंगल क्लिनिकल लॅब), बंडूराजे डोळस (तालुका अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना), नवनाथ रामाणे (शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना), आकाश डोळस (शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना), शेख शहजाद भाई (विधानसभा अध्यक्ष), सचिन विधाते, विशाल गोरे, देवानंद गोरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी यांच्या पुढाकारातून करण्यात आले.

यावेळी रक्तदात्यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशसेवेबरोबरच समाजसेवेचा संदेश देत ६७ नागरिकांनी केलेले रक्तदान हे निश्चितच प्रेरणादायी असून, त्यांच्या या योगदानामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार आहे.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, वैद्यकीय कर्मचारी तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांनी परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button