युवा पिढीने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा वसा घेत समाजाला दिशा द्यावी ,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी संजय खेडेकर
चिखली – आजच्या युवा पिढीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा वसा घेत समाजाला योग्य दिशा देण्याचे आव्हान बाजार समितीचे संचालक राजेश पवार यांनी अंत्री खेडेकर येथे केले.
अंत्री खेडेकर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे नुकतेच शनिवारी दिनांक ८ रोजी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते गजानन वायाळ, कामगार नेते तथा बाजार समितीचे माजी संचालक गजानन पवार, वसंतराव खेडेकर, भिकाजी खेडेकर, अशोक पवार, सागर पवार, शेख दिलावर आपली चिखलीचे संचालक सोमेश खेडेकर ,आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावांमधून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली., शोषित, वंचित, घटकांच्या हक्कासाठी आयुष्यभर साहित्य व संघर्षाच्या माध्यमातून लढा देणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना यानिमित्ताने गावकऱ्यांनी व तरुणांनी आदरांजली अर्पण केली. बाजार समितीचे माजी संचालक गजानन पवार यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनकार्याचा व साहित्याचा सविस्तर आढावा घेतला. तर राष्ट्रवादीचे नेते गजानन वायाळ यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत ग्रामस्थांच्या विकासाबाबत व सामाजिक एक्याबाबत आपले विचार मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर पवार यांनी परिश्रम घेतले.गावात पार पडलेल्या या भव्य जयंती सोहळ्याची व मान्यवरांच्या मार्गदर्शनाची परिसरामध्ये सर्वत्र मोठी चर्चा असून सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



