अकोलाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

बाळासाहेब नेरकर यांना पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

बाळासाहेब नेरकर यांना पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.

हिवरखेड (वार्ताहर )

हिवरखेड येथील दै. महासागर, दै. वैराग्यमूर्ती तसेच एमसीएन न्यूज चॅनलचे प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर यांना यावर्षीचा पत्रकारिता क्षेत्रातील मानाचा असा नवीन सोष्ट्ये स्मृती मराठी पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे. ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्या वतीने दरवर्षी पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकारांना वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मानित केल्या जाते. बाळासाहेब नेरकर यांना पत्रकारिता क्षेत्रातील दीर्घ अनुभव असून त्यांनी या माध्यमातून अनेक समस्या शासनापर्यंत पोहोचवून जनतेच्या समस्या सोडवल्या आहेत. शिवाय त्यांना सामाजिक कार्याची सुद्धा आवड आहे. ते दरवर्षी दिवाळी, संत गाडगेबाबा पुण्यतिथी व जागतिक अपंग दिनी गरीब,बेघर, निराश्रीतांना कपडे व खाद्य पदार्थ वाटप करत असतात. दिनांक 20/08/2026 रोजी गांधी बुक सेंटर, ग्रॅण्ट रोड, नाना चौक मुंबई येथे दिमाखदार सोहळ्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांना हा पुरस्कार जाहीर होताच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button