बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

एकच कुटुंबातील दोन्ही भावांची उत्कृष्ट कामगिरी; शिवरकर बंधूंनी उंचावला जालना पोलिसांचा मान!

जालना :कर्तव्यनिष्ठा आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांनी जालना पोलीस दलात मानाचे स्थान मिळवले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या ‘उत्कृष्ट गुणात्मक कारवाई’ प्रशस्तीपत्रामुळे शिवरकर कुटुंबासाठी हा एक कधीही न विसरता येणारा अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण ठरला आहे.

मोठ्या भावाची धडक कारवाई

अंमली पदार्थांचे रॅकेटउद्ध्वस्तदहशतवाद विरोधी पथक (ATU) जालना येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री मारुती शिवरकर (बकल नंबर ११५०) यांनी २७ जून २०२६ रोजी कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली. नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांची विक्री करणाऱ्या आरोपींची माहिती काढून त्यांनी १०८० बटन गोळ्या आणि २२,३३३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४५/२०२६ नुसार BNS, NDPS आणि औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्यान्वये गुन्हा दाखल करून मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले. त्यांच्या या प्रशंसनीय कामगिरीमुळे जनसामान्यांत जालना पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे.

लहान भावाचीही उत्कृष्ट कामगिरी

याच सुवर्णक्षणाला अधिक आनंदी बनवत शिवरकर कुटुंबातील दुसरे भाऊ श्री सागर दुर्गादास शिवरकर,पोलीस अंमलदार
पोलीस ठाणे टेंभुर्णी गुन्हा रजिस्टर क्रमांक 170/2025 कलम 65 (2) भारतीय न्याय संहिता सह कलम 4, 6, 10, 12 पोक्सो गुन्हयातील पिडीतेचा जबाब कलम 183 BNSS अंतर्गत न्यायालयीन जबाब नोंदवुन घेतला आहे. घटनास्थळी वरील बेडशीट जप्त करुन वैदयकीय तपासणी व्दारे जप्त नमुने CA/FSL दाखल करुन आरोपी वैदयकीय तपासणी तसेच पिडीत Bone Age पुष्टीकरण केले आहे. त्यानुसार मा.न्यायालयात वेळेत दोषारोपपत्र दाखल करुन पुराव्याची साखळी, साक्षीदारांचे जबाब, स्क्रूटणी, तपासपर मार्गदर्शक सुचना, आवश्यक कागदपत्रे, सीए अहवाल, मुद्देमाल आधारे गुन्हयातील आरोपीतास दिनांक 22/06/2026 रोजी कलम 4, 6, 8, 12 बाल लैंगिक अत्याचार कायदा 2012 मध्ये 20 वर्षे सक्त मजुरी 50,000/- रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरी शिक्षा सुनावली आहे. तसेच सदर प्रकरणात महाराष्ट्र शासनाकडुन पिडीतेस रुपये 3,00,000/- भरपाई देण्याचा आदेश मा. विशेष न्यायालयाने दिलेला आहे.

आपल्या प्रशंसनीय कामगिरीमुळे जनसामान्यामध्ये जालना जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा उंचावली गेली आहे. भविष्यात देखील आपण अशीच कामगिरी करत राहावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण व आपल्या पथकाने केलेल्या अशी उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून त्यांनाही सन्मानित करण्यात आले आहे.एकाच वेळी दोन्ही सख्ख्या भावांना त्यांच्या उत्कृष्ट आणि गुणात्मक कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांकडून प्रशस्तीपत्र मिळाल्याने शिवरकर बंधूंवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button