बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

विदर्भाच्या प्रवेशद्वारावर तोरण बांधून श्रींच्या पालखीचे जंगी स्वागत..!

फटाक्यांची अतिषबाजी अन् टाळ-मृदंगाचा गजर

मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवर वारकऱ्यांचा आनंदोत्सव

विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन

वाट धरीता पंढरीची | चिंता हरी संसाराची ||
ऐसे कोठे नसे पायी | धुंडीता ब्रह्मांड पाही ||
पाहिले शोधिणी | तीर्थ आणि देवस्थानी ||
मोक्ष भक्ती पाही | सेना म्हणे लागा पायी ||

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा :
‘अनंत कोटी ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म शेगाव निवासी, भक्तप्रतिपालक, समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज’ यांच्या पालखीचे पंढरीच्या विठूरायाला साकडे घालून परतीच्या प्रवासात विदर्भाच्या प्रवेशद्वारावर आगमन झाले. या वेळी टाळ-मृदंगाचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांच्या वर्षावात पालखीचे अत्यंत थाटात व जंगी स्वागत करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराजांची पालखी शेगाव ते पंढरपूर असा सुमारे १३०० किलोमीटरचा आणि दोन महिन्यांचा परतीचा प्रवास पूर्ण करत सिंदखेड राजा (मातृतीर्थ) परिसरात दाखल झाली. गेल्या ५७ वर्षांपासून महाराजांची पालखी ७०० वारकरी,  अश्व आणि ९ वाहनांसह अखंडपणे पंढरपूर वारी पूर्ण करते. २९ जुलै रोजी पंढरपूरहून परतीच्या मार्गावर निघालेली ही पालखी आज विदर्भाच्या सीमेवर पोहचली. पालखीसोबत रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक, पोलीस प्रशासन, पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि संस्थांचे पहारेकरी यांची चोख व्यवस्था होती.
विविध मान्यवरांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन
विदर्भाच्या सीमेवर आमदार मनोज कायंदे, माजी आमदार शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष सौरभ तायडे व जयश्री तायडे यांनी सपत्नीक श्रींचे पूजन करून दर्शन घेतले. प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे, उपनगराध्यक्ष संगीता म्हस्के यांच्यासह नगर परिषदेचे सभापती, नगरसेवक आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेतले.
विदर्भाच्या प्रवेशद्वारावरील सावरगाव माळ येथील सरपंच व गावकऱ्यांनी पालखीचे दर्शन घेऊन वारकऱ्यांसाठी धान्याची मदत दिली. ठिकठिकाणी भाविकांसाठी चहा व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.

६० फुटी स्वागत कमान अन् जेसीबीने पुष्पवृष्टी

जलशुद्धीकरण केंद्राजवळील हॉटेल तुळजाईजवळ नगराध्यक्ष सौरभ तायडे यांच्या वतीने ६० फुटांची भव्य स्वागत कमान उभारण्यात आली होती. या ठिकाणी दोन जेसीबीच्या साहाय्याने वारकऱ्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. या वेळी उपस्थित सर्व वारकरी व भाविकांमध्ये अभूतपूर्व आनंदोत्सव पाहायला मिळाला.
या प्रसंगी आमदार मनोज कायंदे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष सौरभ तायडे, डॉ. सुनील कायंदे, भाग्यश्री खेडेकर, जिल्हा सरचिटणीस विजयभाऊ तायडे, राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराजे जाधव, युवा सेना उपजिल्हाप्रमुख अतिश तायडे,   उपनगराध्यक्ष संगीता म्हस्के, माजी नगराध्यक्ष सतीश तायडे, मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे, गटनेते ॲड. संदीप मेहेत्रे, दिलीप आढाव, पाणीपुरवठा सभापती कृष्णा मेहेत्रे बांधकाम सभापती पूजा खुरपे गटनेते एडवोकेट संदीप मेहेत्रे गटनेते दिलीप आढाव नगरसेवक गौतम खरात नरहरी तायडे नगरसेवक पोर्णिमा भुसारे नगरसेवक सिंधुताई ठाकरे नगरसेवक पुष्पाताई बारवकर नगरसेविका सोनाली मेहत्रे नगरसेविका अंबिका कोरडे नगरसेवक कैलास म्हस्के  यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपाचे युवा नेते अशोक मेहेत्रे, राष्ट्रवादीचे नेते शेख यासीन राष्ट्रवादीचे युवा नेते नितीन कायदे सिद्धार्थ जाधव शहराध्यक्ष वैभव मीनासे राष्ट्रवादीचे युवा नेते शेख अजीम धांदरवाडी चे सरपंच नितीन शेळके राष्ट्रवादीचे युवा नेते श्याम जाधव राष्ट्रवादीचे नेते मारुती काकडे युवक शहराध्यक्ष आरेफ चौधरी    सभापती ग्रामसेवक सहकारी सोसायटीचे अध्यक्ष रामदास बारवकर  माजी बांधकाम गणेश झोरे  माझी स्वच्छता व आरोग्य सभापती राजेंद्र आढाव राष्ट्रवादीचे युवा नेते दीपक ठाकरे सर मंगेश खुरपे मंगेश बारवकर मंगेश तायडे आकाश तायडे हॉटेल तुळजाईचे संचालक जगन्नाथ बापू देशमुख   नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक चव्हाण पाणीपुरवठा अभियंता शिंगणे मॅडम बांधकाम अभियंता काझी नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपिक कपिल आळशी लेखापाल योगिता राठोड स्वाती वाघ  आरोग्य निरक्षक कैलास सूनगत  तथा सर्व कर्मचारी यांनी श्री पालखीचे स्वागत केले  यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मातृतीर्थात भोजनाचा आस्वाद अन् मुक्काम
पालखीचे जिजामाता नगर मार्गे रामेश्वर मंदिर येथे आगमन झाले. तेथे रामेश्वर मंदिर संस्थानच्या वतीने सर्व वारकऱ्यांसाठी भोजनाची सोय करण्यात आली होती. संस्थानचे अध्यक्ष बाळू म्हस्के, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे, सचिव सचिन महाजन व सदस्यांनी पालखीचे पूजन केले.
भोजनानंतर पालखी नीलकंठेश्वर मंदिर, महात्मा फुले विद्यालय, काळा कोट व तहसील कार्यालयासमोरून जिजामाता महाविद्यालयात मुक्कामासाठी पोहोचली. तेथे जिजामाता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळाजीशेठ तायडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. भाविकांच्या गर्दीमुळे संपूर्ण शहराला यात्रेचे स्वरूप आले होते. ही पालखी आज सकाळी ४ वाजता पुढील प्रवासासाठी किणगाव राजाकडे रवाना होईल.

नगराध्यक्ष सौरभ तायडे यांच्या वतीने वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी

श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचा दोन महिन्यांचा प्रवास पूर्ण होऊन विदर्भात प्रवेश होताच, सिंदखेड राजाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ६० फूट भव्य स्वागत कमान उभारण्यात आली होती. या वेळी दोन जेसीबीच्या साहाय्याने संपूर्ण वारकऱ्यांवर उत्साहात पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच आकर्षक रांगोळी आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत पालखीचे अत्यंत थाटात स्वागत करण्यात आले.

पालखीसाठी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त

विदर्भामध्ये पालखीचे आगमन होताच जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय अधिकारी अर्जुनराव ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आशिष इंगळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक चापाईतकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे, श्रावण डोंगरे व विकास राऊत यांनी चोख बंदोबस्त ठेवला. बंदोबस्तासाठी ५ पोलीस निरीक्षक, ७ पोलीस अंमलदार, १० वाहतूक अंमलदार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी तैनात असून, ३ वाहने शेगावपर्यंत पालखीसोबत राहतील.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button