बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेगाव शहर पोलिसांनी पकडला मोबाईल चोर

शेगाव शहर पोलिसांनी पकडला मोबाईल चोर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

मिळालेली माहिती अशी की आज दिनांक 16/7/2023 चे 12/00 वा. सुमारास बस स्टॅन्ड शेगाव येथे फिर्यादी निकिता साहेबराव अडकिने वय 20 वर्षे राहणार अंजनगाव बसमत जिल्हा हिंगोली यांचा या बसमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात आरोपीने त्यांचे खिशातील Redmi 9 i कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल ज्यात jio कंपनीचा Sim कार्ड क्र 8626083780 मोबाईल किंमत अंदाजे 9000/- रुपयाचा चोरी केला होता. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे अगोदर अज्ञात आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक 402/ 2023 कलम 379 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर अज्ञात आरोपीचा शेगाव शहर पोलिसांनी शोध घेऊन गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद आकीब मोहम्मद अरिफ वय 23 वर्ष रा. हैदरपुर सादिया नगर मद्रासी बाबाच्या मागे अमरावती यास निष्पन्न करून ताब्यात घेऊन अटक केले. आरोपीकडून नमूद मोबाईल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक सुनील सुसर बक्कल नंबर 1092 पोस्ट शेगाव शहर हे करीत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button