“महिलांच्या सन्मानासाठी मुक्ताईनगरात सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा; आज सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयावर धडक”

“अश्लील वक्तव्याचा तीव्र निषेध; विकृत प्रवृत्तीविरोधात मुक्ताईनगरात सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन”महिलांच्या सन्मानासाठी मुक्ताईनगरात आज सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा
मुक्ताईनगर | प्रतिनिधी
महिला लोकप्रतिनिधीं विषयी करण्यात आलेल्या कथित अश्लील वक्तव्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगर येथे आज (बुधवार, ५ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या सन्मानाच्या रक्षणासाठी आणि संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.हा मोर्चा प्रवर्तन चौक ते तहसील कार्यालय, मुक्ताईनगर या मार्गाने काढण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते ना. आमदार एकनाथराव खडसे, केंद्रीय राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे, मंत्री ना. पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ. हिनाताई गावित आणि ॲड. रोहिणीताई खडसे यांच्याविषयी कथित अश्लील शिवीगाळ व बदनामी करणाऱ्या विजय चौधरी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले.या प्रकरणातील संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, तसेच समाजात महिलांविषयी अवमानकारक भाषा वापरणाऱ्यांना कडक संदेश जावा, अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे.आयोजकांनी पक्ष, धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. महिलांचा सन्मान आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी नागरिकांनी एकजुटीने पुढे यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.पत्रकाराचे मत :महिलांचा सन्मान आणि सुरक्षितता हा कोणत्याही सुसंस्कृत समाजाचा मूलभूत आधार आहे. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींविषयी मतभेद असू शकतात, मात्र टीका करताना सभ्य भाषेचे भान राखणे आवश्यक आहे. अशा घटनांवर कायद्याच्या चौकटीत कारवाई होणे आणि समाजानेही अशा प्रवृत्तीला ठाम विरोध करणे, ही लोकशाही मूल्यांची खरी जपणूक ठरेल.



