समाजसेवेतून राजकारणात प्रवेश; अभ्यासू, आक्रमक आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे ॲड. चेतन रविंद्र झनके

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस |
विशेष प्रतिनिधी
मुक्ताईनगर परिसरातील सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे ॲड. चेतन रविंद्र झनके हे अभ्यासू, आक्रमक आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी तत्पर नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ समाजकार्यातून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.ॲड. चेतन झनके यांचे प्राथमिक शिक्षण मराठी मुलांची शाळा क्रमांक २, मुक्ताईनगर येथे झाले. त्यानंतर त्यांनी जे. ई. स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मुक्ताईनगर येथून विज्ञान शाखेचे शिक्षण पूर्ण केले. पुढे एस. बी. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, इंदापूर (पुणे विद्यापीठ) येथून बी.ई. (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) पदवी प्राप्त केली. त्यानंतर समाजकार्यास कायदेशीर बळ मिळावे या उद्देशाने डॉ. उल्हास पाटील लॉ कॉलेज येथून एलएलबी पदवी संपादन केली. मेकॅनिकल इंजिनिअरिंग करण्यामागे त्यांचा मूळ उद्देश आरटीओ इन्स्पेक्टर होण्याचा होता.सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या चेतन झनके यांच्या वडिलांनी जिल्हा परिषद-पंचायत समितीमध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून सुमारे ३० वर्षे सेवा बजावल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती (VRS) घेतली.कोरोना महामारीच्या काळात कठोर लॉकडाऊन असताना मुक्ताईनगर चौकात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नियमित चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यापासून त्यांच्या सामाजिक कार्याची ठळक सुरुवात झाली. याच काळात गरजू नागरिक, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत, कोविड रुग्णांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, शासकीय कार्यालये व रुग्णालयांतील कामांमध्ये मार्गदर्शन करणे तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व करिअर मार्गदर्शन करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले.समाजकार्य अधिक प्रभावी आणि कायदेशीर चौकटीत करता यावे, या उद्देशाने त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. सामाजिक बांधिलकी हीच त्यांच्या कार्याची प्रेरणा ठरली.राजकारणात प्रवेश करण्याचा त्यांचा प्रारंभी कोणताही विचार नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा प्रभाव स्वीकारून ते समाजकार्यात सक्रिय होते. मुक्ताईनगरातील घनकचरा व्यवस्थापनातील अनियमितता, घंटागाडीचा प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीविरोधात त्यांनी अभ्यासपूर्ण आणि ठाम भूमिका घेतली. त्यानंतर स्थानिक तरुणांच्या आग्रहातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.महाविकास आघाडीतील घडामोडींनंतर अखेर काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळवत त्यांनी निवडणूक लढवली. पराभवानंतरही खचून न जाता दुसऱ्याच दिवसापासून पुन्हा समाजकार्यात स्वतःला झोकून देत, “निवडणूक ही दुसरी प्राथमिकता; लोकांची कामे करणे हीच पहिली प्राथमिकता” या भूमिकेवर ते आजही ठाम आहेत.”एक कॉल… प्रॉब्लेम सॉल्व” हा त्यांचा जनसंपर्काचा मंत्र ठरला आहे. नागरिकांची शासकीय कार्यालये, रुग्णालये, महसूल, पोलीस, नगरपरिषद आदी विभागांतील कामे मार्गी लावण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करतात. प्रशासनातील दिरंगाईवर अभ्यासपूर्ण आणि आक्रमक भूमिका घेत जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.डिझेल टंचाईच्या काळात इंधनाचा गैरवापर, इंधन दरवाढीविरोधातील आंदोलन, शेतकरी प्रश्न, विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधातील आंदोलन, तसेच महिलांसाठी स्वच्छतागृह, शहरातील सीसीटीव्ही व्यवस्था, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यांच्या सुशोभीकरणासह विविध जनहिताच्या मागण्यांसाठी त्यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे.सामाजिक बांधिलकी, अभ्यासू वृत्ती, आक्रमक नेतृत्व आणि जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता या गुणांच्या जोरावर ॲड. चेतन रविंद्र झनके यांनी मुक्ताईनगर परिसरात समाजाभिमुख कार्यकर्ते म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जनतेचा विश्वास हीच आपली खरी ताकद मानत, लोकसेवेचा प्रवास अधिक व्यापक करण्याचा त्यांचा संकल्प कायम आहे.



