खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

वळती येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरी 

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुका : प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे

चिखली तालुक्यातील वळती येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच सुनील चिंचोले होते. त्यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मातंग सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भाई छोटू कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक योगदानावर सविस्तर प्रकाश टाकला. सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून आणि पोवाड्यांतून शोषित, वंचित समाजाचा आवाज बुलंद केला. समाजाने शिक्षण, संघटन आणि सामाजिक जागृतीच्या माध्यमातून प्रगती साधावी, हीच अण्णाभाऊंना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमात उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मातंग सेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते  सौरभ बावस्कर, सोमनाथ लेंडे, शरद यंगड, संतोष यंगड, विकास यंगड, सोमनाथ यंगड, शुभम यंगड, पंडित खरात, मंगलाबाई यंगड, सुशीलाबाई शिंगणे, कमलबाई शिंगणे, पोलीस बांधव  यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button