बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

वाढदिवसाचा जल्लोष नव्हे; समाजसेवा, शिक्षण आणि लोकोपयोगी कार्याचा संकल्प!राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक डॉ. रामप्रसाद शेळके यांचा वाढदिवस विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रमांनी उत्साहात साजरा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी;–शंकर शिवरकर

देऊळगाव राजा; “वाढदिवस हा केवळ शुभेच्छा स्वीकारण्याचा दिवस नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी अधिक दृढ करण्याचा संकल्प आहे,” असे डॉक्टर रामप्रसाद शेळके यांनी सत्काराला उत्तर देताना दिनांक 14 जुलै रोजी स्थानिक राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये उपस्थितांना संबोधले . यावेळी शेकडो विद्यार्थ्यांसमोर याच भावनेतून राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक, ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते तथा देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. रामप्रसाद शेळके यांचा वाढदिवस विविध सामाजिक, शैक्षणिक, सेवाभावी व सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक, गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम शिक्षण मिळावे या उद्देशाने डॉ. शेळके यांनी सीबीएसई संलग्न राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलची स्थापना केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी दारे खुली झाली आहेत. ते नियमितपणे शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतात तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवितात.
शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही डॉ. शेळके यांचे योगदान उल्लेखनीय आहे. अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे, गरजूंच्या मदतीला धावून जाणे, युवकांना योग्य मार्गदर्शन करून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यामुळे ते अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.
वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना वह्यांचे व शैक्षणिक साहित्याचे वाटप, रुग्णांना फळांचे वितरण, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तसेच विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना नागरिक, पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्री-प्रायमरी विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प देऊन डॉ. शेळके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी शिक्षण, संस्कार आणि समाजसेवा हीच खरी जीवनमूल्ये असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि प्रामाणिकपणे ती पूर्ण करण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमात शिक्षक राहुल जाधव यांनी डॉ. शेळके यांच्या कार्याला समर्पित गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कुणाल यांनी सुरेल गीत सादर केले, तर झिने यांनी विद्यार्थ्यांसमवेत सामूहिक गीत सादर करून वातावरण भारावून टाकले. विद्यार्थिनी गायत्री गरड व वरद गढीकर यांनी मनोगत व्यक्त करत डॉ. शेळके यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीच्या विद्यार्थिनी गौरी चव्हाण व निकिता गीते यांनी केले.
या कार्यक्रमास शाळेच्या अध्यक्षा कु. राजलक्ष्मी रामप्रसाद शेळके, उपाध्यक्षा डॉ. मीनल शेळके, सहसचिव ज्योतिरादित्य रामप्रसाद शेळके, कोषाध्यक्ष विलास शेळके, संचालक सुजित गुप्ता, मुख्याध्यापिका प्रियंका देशमुख, प्री-प्रायमरी व प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा इंगळे तसेच पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विविध क्षेत्रांतील , सामाजिक ,राजकीय , पत्रकार , शैक्षणिक ,व ईतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. रामप्रसाद शेळके म्हणाले, “माझा वाढदिवस हा केवळ माझा वैयक्तिक आनंदाचा दिवस नाही. हा दिवस समाजोपयोगी, लोकोपयोगी आणि शैक्षणिक कार्याला समर्पित करण्याचा माझा संकल्प आहे. समाजाने दिलेल्या प्रेमाचे ऋण समाजसेवेतून फेडण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन.”
वाढदिवसाचे औचित्य साधून समाजसेवा, शिक्षण आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, डॉ. रामप्रसाद शेळके यांच्या या उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श समाजासमोर उभा राहिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button