हिवरखेड पोलिसांनी दिले 10 गोवंशाना जीवनदान

हिवरखेड (वार्ताहर )
पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातून अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन पाटील यांनी आपल्या सहकाऱ्या सोबत कारवाई करत 10 गोवंशाना जीवनदान दिले.हिवरखेड पोलीस स्टेशनला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पंचासमक्ष पोलिसांनी कारवाई केली असता सर्जन दलसिंग भटनागर व महेंद्र रोकड्या चापले रा. चंदनपूर हे हिवरखेड हद्दीतील ग्राम झरी बाजार येथून 10 गोवंश बैल अतिशय निर्दयीपणे, मारहाण करत घेऊन जात असल्याचे असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहताच दोन्ही आरोपीनी अंधाराचा फायदा घेत घटना स्थळावरून पोबारा केला.पोलिसांनी घटना स्थळावरून गोवंश जातीचे बैल अंदाजे किंमत 387000 जप्त केले. व हिवरखेड पोलीस स्टेशनला आरोपी विरुद्ध अपराध क्रं.385/2026 कलम 5,5(अ ), 9,9(अ )महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम 11 प्राणी छळ प्रतिबंधित अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक,अपर पोलीस अधीक्षक रेड्डी साहेब साहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन पाटील, पोहेकॉ विनोद खर्डे, पोहेकॉ प्रमोद चव्हाण, पोहेकॉ प्रविण कुंजाम, पोहेकॉ रोहन बोराडे यांनी केली.झरी बाजार मार्गे मध्यप्रदेशातून गोवंश तस्करीचा फार मोठा अवैध व्यवसाय असून या मार्गावर यापूर्वी सुद्धा अनेक कारवाया झाल्या आहेत पण तरीही हा अवैध व्यवसाय सुरूच असून पोलिसांनी याचा कायम बंदोबस्त करावा अशी गोप्रेमींची मागणी आहे.



