आ. एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवाची जय्यत तयारी; ३० ऑगस्टला कोथळी येथे भव्य सर्वपक्षीय सोहळा

:’अमृत सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा’; ॲड. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांचे नागरिकांना आवाहन
मुक्ताईनगर | प्रतिनिधी माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘अमृत महोत्सव सप्ताह’ विविध धार्मिक, सामाजिक व सार्वजनिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहातील मुख्य अमृत महोत्सवी सोहळा रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता संत मुक्ताई मंदिर, कोथळी येथे भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी केले आहे.यासंदर्भात मुक्ताईनगर येथील खडसे फार्म हाऊस येथे नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत अमृत महोत्सव समितीचे सचिव प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा सादर करत विविध समित्यांची स्थापना, त्यांची जबाबदारी तसेच कार्यक्रमाचे नियोजन याविषयी सविस्तर माहिती दिली.यावेळी बोलताना प्रा. डॉ. नेवे यांनी अमृत महोत्सवाच्या मुख्य सोहळ्यासाठी विविध पक्षांचे केंद्रीय व राज्यस्तरीय नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली. तसेच, २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.बैठकीला माजी सभापती निवृत्ती पाटील, अनिल वराडे, विलास धायडे, दशरथ कांडेलकर, राजेंद्र माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास चौधरी, रामदास पाटील, गणेश पाटील, विकास पाटील, बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ, सरपंच डॉ. बी. सी. महाजन, ईश्वर रहाणे, नारायण चौधरी, प्रभाकर झोपे, निलेश पाटील, रामभाऊ पाटील, प्रशांत (आबा) पाटील, किशोर महाजन, वसंत पंढरीनाथ पाटील, भागवत पाटील, अतुल पाटील, पराग पाटील, अजय भारंबे, ज्ञानेश्वर पाटील, किशोर गायकवाड, नंदकिशोर हिरोळे यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अमृत महोत्सव सप्ताहाच्या निमित्ताने धार्मिक, सामाजिक आणि जनसहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व स्तरांवर नियोजनाला वेग देण्यात आला आहे. नागरिकांनी या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होऊन आ. एकनाथराव खडसे यांना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




