गोदरी गावच्या दोन सुपुत्रांचा गौरव; मुंबई पोलिस व इंडियन आर्मीमध्ये निवड

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी चिखली:- सलमान पठाण सवणा
चिखली तालुक्यातील गोदरी गावचे सुपुत्र गौरव संतोष परिहार व गौरव सुधाकर भालेराव यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर गावाचे नाव उज्वल केले आहे. गौरव संतोष परिहार यांची मुंबई पोलिस S.P.R.F. दौड पदी तर गौरव सुधाकर भालेराव यांची इंडियन आर्मीमध्ये निवड झाल्याबद्दल गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
युवासेना जिल्हाप्रमुख नंदुभाऊ कन्हाडे यांनी संकष्टी चतुर्थीच्या शुभदिनी गणपती बाप्पांचे पूजन करून समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत दोघांचा सत्कार व सन्मान केला. यावेळी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच गावातील व पंचक्रोशीतील युवकांनी या यशस्वी युवकांचा आदर्श घेऊन शिक्षण, मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश संपादन करावे, असे आवाहनही करण्यात आले.
या कार्यक्रमाला समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.



