बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेलसुर येथे ‘माणकेश्वर महाराज कावड यात्रा’ उत्साहात; युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांची सस्नेह भेट

मनोभावे घेतले श्री महादेवाचे दर्शन;

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी प्रशांत चव्हाण

बुलढाणा – छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन…!
शेलसुर | दि. ३१ ऑगस्ट २०२६
श्रावण मासातील पवित्र सोमवारचे औचित्य साधून चिखली विधानसभा मतदारसंघातील ग्राम शेलसुर येथे माणकेश्वर महाराज कावड यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक सोहळ्याला शिवभक्तांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भक्तिमय वातावरणात कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. संजुभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र तथा बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी माणकेश्वर महाराज कावड यात्रेला सस्नेह भेट दिली. यावेळी त्यांनी श्री महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले आणि उपस्थित शिवभक्तांशी संवाद साधला.
तसेच शेलसुर येथे उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ स्मारकास पुष्पहार अर्पण करून युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याच्या विचारांना अभिवादन करत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
श्रावण सोमवारच्या निमित्ताने आयोजित या कावड यात्रेत ‘हर हर महादेव’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा जयघोषाने शेलसुरचा परिसर दुमदुमून गेला. कावडधारी शिवभक्त, युवक, नागरिक, माता-भगिनी आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने संपूर्ण परिसरात भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार श्री. मनोज कायंदे, बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे संचालक श्री. मयूर बाहेकर, श्री. मनोज लाहुडकर, दीपक तुपकर, गणेश यंगड, राम शेळके, ज्ञानेश्वर खांडवे यांच्यासह श्री माणकेश्वर कावड यात्रा समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, गावातील नागरिक, माता-भगिनी तसेच शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रावण सोमवारच्या पावन पर्वावर शेलसुर येथे पार पडलेल्या माणकेश्वर महाराज कावड यात्रा महोत्सवामुळे गावात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. भगवान महादेवाच्या भक्तीसोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन करून हिंदवी स्वराज्याच्या महान परंपरेला मानवंदना देण्यात आली….!

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button