बुलढाणा

तिन आरोपीकडून दुचाकी ची चोरी उघडकीस

तिन आरोपीकडून दुचाकी ची चोरी उघडकीस

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर शेगाव शहरातील पिंजारी गल्ली मधून एक मोटरसायकल चोरी करून पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांनी शोध घेत या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली. तसेच पीसीआरदरम्यान त्यांचे ताब्यातून चोरी गेलेले वाहन जप्त केले.याबाबत पोलीस सूत्राकडून प्राप्त माहिती अशी की, फिर्यादी अब्दुल रहेमान अब्दुल जब्बार वय ५५ वर्षे रा. आळसणा रोड यांची दिनांक १० मे २०२३ रोजी दुपारी ०२:०० वा. सुमारास पिजारी गल्ली शेगांव येथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने एमएच २८ एसी ३७८१ क्रमांकाची हिरो स्प्लेंडर प्रो मो.सा. चोरुन नेली होती. त्याबाबत त्यांनी शेगांव शहर पो.स्टे.ला दिलेल्या रिपोर्टवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ ‘भादंविनुसार गुन्हा दाखल केलापो.स्टे. शेगांव शहर येथील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पो.उप.नि. राहुल कातकाडे, पो.हे.कॉ. गजानन वाघमारे, नापोकॉ गणेश वाकेकर, पो. कॉ. विजय साळवे, जितेंद्र झाडोकार, प्रकाश गव्हांदे, आशिष भारती यांनी ठाणेदार यांच्या मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे केला. सदर गुन्ह्यात आरोपी अब्दुल शोएब अब्दुल फारूक वय १९ वर्षे रा. अंबीका नगर अकोला, नदीम बेग ऊर्फ रावगीट्टी कलीम बेग वय २७ वर्षे रा. सोनटक्के प्लॉट अकोला व मोहम्मद समीर मोहम्मद शरीफ वय २४ वर्षे रा. मोमीनपुरा नागपुर यां तीन जणांना आरोपी असल्याचे निष्पन्न करुन गुन्हा उघडकीसजुलै रोजी अटक करुन विद्यमान न्यायालयाकडुन त्यांचा ८ दिवस पीसीआर घेतला. पीसीआरदरम्यान विचारपुसमध्ये त्यांनी नमुद गुन्ह्याव्यतिरिक्त अकोला येथील आणखी दोन गुन्ह्याची कबुली दिली. त्यात दोन टाटा एस. वाहने चोरी केल्याचे त्यांनी सांगितले होते.आरोपीतांनी दिलेल्या कबुलीप्रमाणे सदर पथकाने नागपुर येथे जाऊन त्यांनी चोरलेली दोन्ही टाटा एस. वाहने जप्त करून उल्लेखनीय कामगीरी केली. सदर गुन्ह्याचा तपास सुरु असुन आरोपीतांकडुन आणखी चोरीच्या दुचाकी किंवा इतर वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button