मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई वाढली : राहुलभाऊ बोंद्रे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली…. प्रतिनिधी
चिखली: पेट्रोल-डिझेलसाठी नागरिकांना एक- दोन किलोमीटरच्या रांगा लावाव्या लागत असून रात्रभर पंपावर थांबण्याची वेळ जनतेवर आली आहे. २४-२४ तास लोकांना पेट्रोल-डिझेलसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. ही महागाई नैसर्गिक नाही, तर मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे निर्माण झालेली आहे. सरकार जनतेच्या खिशातील पैसा काढून घेत आहे. इराण आणि रशिया भारताला स्वस्त दरात इंधन देण्यास तयार असतानाही सरकार अमेरिकेच्या दबावाखाली काम करत असल्याचा घणाघात माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केला.
पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईविरोधात तसेच शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करुन देण्यासाठी २७ मे रोजी चिखली तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी राहुलभाऊ बोंद्रे बोलत होते. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला डिझेल मिळत नाही, कॅनमध्ये डिझेल देत नाही आणि त्यामुळे प्रचंड त्रास शेतकऱ्यांना होतोय, शेतीची कामे थांबलेली आहेत. काल-परवाच खताचे भाव ३०० रुपयांनी वाढलेत. सरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा चिखली तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा देण्यात आला.
याप्रसंगी राहुलभाऊ बोंद्रे यांच्यासह तालुका काॅगे्रसचे अध्यक्ष रामभाऊ जाधव, माजी सभापती विष्णु पाटील कुळसुंदर, समाधान सुपेकर, भाई प्रदिप आंभोरे, नंदुभाऊ शिंदे, श्याम पठाडे, डाॅ. माहेमंद इसरार, सचिन बोंद्रे, युवक काॅगे्रसचे अंबादास वाघमारे, गाजी बाबा, विजय पाटील शेजोळ



