अकोलाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

रेल्वेच्या नावाखाली वाण नदीची चिरफाड?

महेंद्र कराळे

हिवरखेड प्रतिनिधि दानापूर परिसरावर भविष्यात भीषण पाणी संकटाची टांगती तलवारतेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसरात सध्या सुरू असलेले वाण नदीतील उत्खनन भविष्यात मोठ्या पर्यावरणीय संकटाला निमंत्रण देणारे ठरत असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. अकोट ते अमला खुर्द रेल्वेमार्गाच्या कामासाठी मातीची गरज भासत असताना आता ठेकेदारांनी थेट नदीपात्रावरच बुलडोझर चालवल्याचा आरोप होत आहे.अडगावपर्यंत रेल्वेचे काम पूर्णत्वाकडे गेले असून पुढील टप्प्यात हिवरखेड – दानापूर – सोनाळा मार्गावर काम सुरू आहे. मात्र या कामाच्या आड “विकास” नावाखाली नदीची अक्षरशः चिरफाड सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शासनाची परवानगी केवळ तीन मीटर खोदकामाची असताना प्रत्यक्षात तब्बल २१ फूट खोल नदी उकरली जात असल्याची धक्कादायक चर्चा परिसरात सुरू आहे.प्रशासन डोळेझाक करत आहे का?हा प्रश्न आता नागरिक उघडपणे विचारू लागले आहेत. दिवसाढवळ्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर माती उपसा सुरू असताना संबंधित विभागाचे अधिकारी मात्र मौन बाळगून असल्याने संशय अधिक गडद होत आहे.वाण नदी ही दानापूरसह परिसरातील अनेक गावांची जीवनवाहिनी मानली जाते. याच नदीवर शेती, विहिरी, पिण्याचे पाणी आणि भूजल पातळी अवलंबून आहे. आज नदीचा तळ खोल करून नैसर्गिक प्रवाह बिघडवला जात असेल तर उद्या परिसरातील शेतकऱ्यांना कोरड्या विहिरी आणि टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ शकते.“रेल्वे हवी, पण नदी उद्ध्वस्त करून नाही!”अशी संतप्त प्रतिक्रिया आता ग्रामस्थांमधून उमटत आहे. विकासाच्या नावाखाली जर भविष्यातील पाणीच हिरावले जाणार असेल, तर हा विकास नेमका कोणासाठी? असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.आज गरज आहे ती फक्त चर्चा करण्याची नाही, तर नदी वाचवण्यासाठी एकत्र उभे राहण्याची. अन्यथा काही मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी संपूर्ण परिसराला भविष्यात पाणीटंचाईची मोठी किंमत मोजावी लागू शकते.“वाण नदी वाचली तरच दानापूर वाचेल” — अशी भावना आता गावागावातून व्यक्त होत आहे.प्रतिक्रिया.(1)गेल्या 10 दिवसापासून रेल्वेच्या कामाला सुरुवात झाली आहे.मात्र या संदर्भात दानापूर ग्रामपंचायत ला कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली .शिवाय दानापूर ग्रामपंचायत चा काम सुरू करण्याची कोणतीच परवानगी घेतलेली नाही . या संदर्भात वेळोवेळी तहसीलदार, पाटबंधारे विभाग ,मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासोबत फोन वर चर्चा केली असता काम वरच्या पातळीवर सुरू आहे आम्हाला काहीही माहीत नसल्याची उत्तरे देण्यात आली..सपना वाकोडे .प्रशासक ग्रामपंचायत दानापूर.(2)ऐतिहासिक व पर्यावरणीय महत्व असलेली तेल्हारा तालुक्यातील वान नदी भैगोलीक व पर्यावरणीय संरचना बिघडणार नाही याची प्रशासनाने काळजी घेणे गरजेचे आहे स्थानिकांचा, शेतकरी,व ग्रामस्थानचा विरोध असतांनाही प्रशासनाचा उत्खनन करण्याचा अट्टहास कशासाठी?उत्तम नळकांडेवान फाउंडेशन3) वान नदी पात्रातील उत्खनन बाबतीत तहसीलदार तेल्हारा यांच्याशी दूरध्वनी क्रमांकाने संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button