पोलीस निरीक्षक दत्तात्रय आव्हाळे यांचे सर्व शेतकरी बांधवांना आवाहन

विनाकारण तणावग्रस्त केल्यास आधी ट्रॅक्टर जप्तीचे आदेश
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
भारत कृषीप्रधान देश आहे आणि भारतातील मुख्यता वाटचाल आर्थिक स्थिती सर्वसामान्य व्यक्तींचीही शेती हा कणाआहे.
अवघ्या काही दिवसांनी पावसाळ्याला सुरुवात होणार त्यामुळे हवामान तज्ञाच्या विशेष अनुसरून बऱ्याच प्रमाणात शेतकरी वर्ग कामाला लागलेला आहे.
शेतकरी शेत काम करत असताना आपण पाहतो की सर्वाधिक फौजदारी प्रकरणे मारधाडी प्रकरणे 302 व इतर प्रकरणे सर्वाधिक वादग्रस्त प्रकरणे हे शेतीशी निगडित असतात यांनी ट्रॅक्टर अडवलं त्यांनी धुरा फोडला त्यांनी वखरन माझ्या शेतात आणले नागरन माझ्या मधातटाकले, या अशा कृत्यामुळे सर्वस्वी परिणाम व संबंधित दोन शेतकऱ्यांचा वादग्रस्त परिणाम शेवटी पोलीस प्रशासनाकडे हस्तक्षेप होतो मी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना नम्रतेची विनंती करतो की संबंधित शेतीचे काम करत असताना शेत नागरण करणे शेत रोटावेटर करणे शेत व करणे इत्यादी काम करत असताना जोपर्यंत समोरचा शेतकरी संबंधित धुरा किंवा शेतीत उपस्थित राहणार नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची भूमिका संबंधित शेतमालक। किंवा ट्रॅक्टर मालक यांनी घेऊ नये अन्यथा यापुढे कुठल्याही बाबतीत धुरा किंवा इतर तक्रार संबंधित बाबीची ठाण्यांतर्गत दाखल झाले असताना पहिल्यांदा ट्रॅक्टर जप्तीचे आदेश देण्यात येईल कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा तसेच सर्व नागरिकांमध्ये एकोपा कायम रावा यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की दोन शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सदर शेत जमिनीचे काम करण्यात यावे समोररील शेतकरी हजार नसल्यास आणि अशा पद्धतीची घटना घडल्यास सुरुवाती प्रथम ट्रॅक्टर मालक व ट्रॅक्टर चालक यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात येईल शिवाय बऱ्याच प्रमाणात शेतकरीवर्ग बी बियाणे खते या बाबी करिता बुरशीजन्य व इतर उगम क्षमता वाढावे यासाठी औषधी चा वापर करण्यात येतो . मात्र या औषधीचा वापर करत असताना कुठल्याही बाबतीत अगोदर माहिती पूर्व माहिती घेऊनच सदर बाबीचे नियोजन करावे शिवाय जनावरे व इतर पशुपक्षी याला कसल्याही प्रकारचे बाधित होणार नाही याची खबरदारी घेऊन परिसरातील सर्व शेतकरी वर्गाने खरीप पेरणी करिता योग्य नियोजन करून तसेच सर्व सहकार्याचे काम करून पोलीस प्रशासन महसूल प्रशासन व इतर प्रशासनाला सहकार्य करावे अशी आवाहन मालेगाव येथील नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक दत्तात्रय आव्हाळे यांच्या वतीने करण्यात आले.



