बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

सायखेड शिवारातील खोदलेल्या नाल्याविरोधात शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

संग्रामपूर:- २५ मे २०२६
प्रति,
मा.तहसीलदार साहेब,तहसील कार्यालय संग्रामपूर

विषय :- सायखेड शिवारातील गट नं. 39 मध्ये नाला खोदल्या बाबत..

महोदय,
वरील विषयास अनुसरून विनंती पूर्वक निवेदन सादर करतो कि मी बेबाबाई शंकर सरदार राहणार पंचशील नगर सोनाळा.
साहेब गेल्या वर्षी उन्हाळ्यात आमच्या मालकीच्या शेतातून नाला खोदण्यात आला आहे ज्याच्यामुळे आमच्या शेताचे दोन तुकडे झाले आहे आम्हाला शेतात जाण्यास रस्ता राहिला नाही, शेतीची मशागत करण्यास अडचण निर्माण झाली आहे, गेल्या वर्षी पण अशा मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागलं, ज्यांच्यामुळे आमचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील झाले, आम्ही वारंवार शासन प्रशासनातील अधिकाऱ्यांना मौखिक विचारना केली कि हे काम आम्हाला कुठलीही पूर्व सूचना न देता कोणी केलं कोणत्या विभागाने केलं तेव्हा आम्हाला याचं समाधानकारक उत्तर मिळालं नाही. आता आम्हाला या वर्षी सुद्धा शेताची मशागत करायची आहे. पेरणी पाण्याचे दिवस जवळ येत आहे. आमच्या शेताचे दोन तुकडे झाल्यामुळे आम्हांला शेतीची मशागत करण्यास मोठ्या अडचणींना समोरे जावं लागत आहे.तरी आपणास विनंती करत आहोत कि आपल्या स्तरावरून या खोदलेल्या नाल्याची चौकशी करावी, कोणत्या विभागाने हे काम केलं आहे याची चौकशी करावी आणि खोदलेला नाला त्वरित बुजून टाकावा व आमचे जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई करून दयावी ही विनंती. वरील मागाण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून येत्या 8 दिवसात न्यायिक निर्णय द्यावा अन्यथा आम्ही आमच्या परिवारातील सर्वांना घेऊन लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू याची नोंद घ्यावी. या मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार आपलं शासन प्रशासनच असेल याचीही नोंद घ्यावी. करिता आपल्या सेवेशी नम्रपने लेखी विनंती अर्ज सादर करीत आहोत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button