बुलढाणामनोरंजनमहाराष्ट्रशैक्षणिक

जिल्हास्तरीय व विभाग स्तरीय जि. प. कर्मचारी क्रीडा स्पर्धामध्ये अलका चव्हाण यांची 08 पदकांची कमाई .

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी : प्रशांत चव्हाण

बुलढाणा : जि .प. अधिकारी. कर्मचारी क्रीडा स्पर्धा २०२६, चे आयोजन बुलढाणा जिल्हा येथे करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये अनेक कर्मचारी व अधिकारी यांनी सहभाग घेतला होता. सौ. अलका प्रशांत चव्हाण यांनी या स्पर्धेत जळगाव जामोद पंचायत समितीचे नेतृत्व करत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.
त्यात त्यांनी
गोळा फेक प्रथम क्रमांक
थाळी फेक प्रथम क्रमांक
भालाफेक प्रथम क्रमांक
कॅरम द्वितीय क्रमांक

100 मी. धावणे प्रथम क्रमांक
अशा प्रकारे ॲथलेटिक्सच्या चारही क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी जळगाव जामोद पंचायत समितीचे नाव जिल्हास्तरावर नेले.
या स्पर्धांमधूनच त्यांची बुलढाणा जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी विभाग स्तरावर निवड झाली. विभाग स्तरीय स्पर्धा ह्या दि. 12 13 व 14 फेब्रुवारी या दिवशी बुलढाणा क्रीडा संकुल येथे पार पडल्या. या स्पर्धांमध्ये एकूण पाच जिल्ह्यांनी सहभाग घेतला होता.
सौ. अलका प्रशांत चव्हाण यांनी
गोळा फेक प्रथम
100 मी. धावणे प्रथम
थाळी फेक द्वितीय
अशी घवघवीत तीन पदके मिळवून देऊन बुलढाणा जिल्ह्याला चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळवण्यात हातभार लावला.
जिल्हास्तर व विभाग स्तर अशा दोन्ही मिळून त्यांनी या क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण 08 पदकांची कमाई केली
त्यांच्या या आठ पदकांमुळे पंचायत समिती जळगाव जामोद तसेच जिल्हा परिषद बुलढाणा यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button