खाजगी ट्रॅव्हल्स बसने घेतला पेट

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव :-दि.२० सकाळी ८ वाजता सुमारास शेगाव शहरातून अकोलाच्या दिशेने निघालेल्या मध्यप्रदेश पासींग असलेल्या स्वस्तिक ट्रॅव्हल्स या खाजगी कंपनीच्या इंदौर-अकोला या लक्झरी बसला वाटेत आग लागून त्यात संपुर्ण बस पुर्णतः जळाल्याची घटना घडली. सदर दुर्घटना शेगाव बाळापूर रोडवर शेगावपासून ४ कि.मी. अंतरावर घडली.या दुर्घटनाग्रस्त लक्झरीने सर्वप्रथम एका दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकी बसखाली अडकली आणि काही क्षणातच बसचेटायर फुटले अन् बसने पेट घेतला. या दुर्घटनेत संपुर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मात्र तत्पुर्वी बसमधील सर्व प्रवासी व चालक सुखरूप बाहेर पडू शकले, हे त्या सर्वांचे सुदैवच मानावे लागेल. या दुर्घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्यालाउपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले आहे.दरम्यान घटनेची माहिती मिळताच बाळापूर व शेगाव नगर परिषदेची अग्निशमन वाहने घटनास्थळी पोहोचली व आग विझविण्यास मदत केली. तसेच नागरिकांनीही घटनास्थळी एकच गर्दी केली होती



