शेगाव बस स्टँडवर धक्कादायक विनयभंग ! 16 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा हात धरून छेडछाड; आरोपी विरुद्ध गुन्हा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहुरकर
शेगाव:- ७ एप्रिल रोजी एका महाविद्यालयीन युवतीने स्थानिक शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, ती महाविद्यालयातून जाण्याकरिता शेगाव बस घरी स्थानक येथे आपल्या मैत्रिणींसह बसची वाट पाहत असताना गव्हाण येथील पवन पंजाबराव इंगळे हा युवक त्यांच्याजवळ आला व त्याने वाईट वृत्तीने युवतीशी संभाषण करून तिचा विनयभंग केला. सदर घटना येथील बस स्थानक येथे दुपारी ४ वाजता सुमारास घडली आहे.
पीडितेच्या
तक्रारीवरून आरोपी पवन पंजाबराव इंगळे, रा. वरूड तालुका शेगाव याच्या विरुद्ध कलम ७४ भारतीय न्याय संहिता सहकलम ८, १२ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रार दाखल होताच पोलिस यंत्रणेने आरोपीस पोलिसी खाक्या दाखवून आरोपी कडून कबुली मिळवली
ठाणेदारांची सक्त ताकीद
तोंडी
व त्यास अटक केले. तर न्यायालयाने आरोपीस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानुसार आरोपीस बुलढाणा येथील न्यायलीयन कोठडीत पाठविण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनात स.पो. निरीक्षक गजानन सोनटक्के हे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
जर कोणी गर्दीच्या ठिकाणी मुलींना किंवा महिलांना त्रास देतांना आढळला तर त्याचा कुठल्याही प्रकारचा मुलाहिजा करण्यात येणार नाही, अशी सक्त ताकीद पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांनी दिली आहे



