खानदेशगुन्हेगारीजळगावा जिल्हामहाराष्ट्र

“लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांचा छळ; केवायसीच्या बहाण्याने अश्लील मागण्या, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल”

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी


“लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांचा छळ; केवायसीच्या बहाण्याने अश्लील मागण्या, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल”


शहरात सरकारी योजनेच्या नावाखाली महिलांचा गैरफायदा घेण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, ‘लाडकी बहीण’ योजनेच्या केवायसी प्रक्रियेच्या बहाण्याने एका महिलेला अश्लील प्रस्ताव देत छळ केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या पतीचा मित्र गोकूळ चव्हाण याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात राहणाऱ्या सुमारे ३५ वर्षीय महिलेला ‘लाडकी बहीण’ योजनेचे केवायसी करायचे होते. २५ जानेवारी रोजी तिच्या पतीचा मित्र असल्याचा विश्वास संपादन करून आरोपी चव्हाण तिच्या घरी आला. त्याने कागदपत्रे घेऊन प्रक्रिया करून देण्याचे आश्वासन दिले; मात्र त्यानंतर त्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत अश्लील प्रस्ताव ठेवला.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित महिलेने ही बाब आपल्या पतीला सांगितली. यामुळे कुटुंबात तणाव निर्माण झाला; तरीदेखील आरोपीने आपली वर्तणूक सुधारली नाही. उलट, तो वारंवार महिलेच्या घरासमोर येऊन उभे राहणे, तिच्याकडे टक लावून पाहणे अशा प्रकारे मानसिक छळ सुरूच ठेवत होता. अखेर ८ एप्रिल रोजी पुन्हा त्रास दिल्यानंतर पीडित महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

धक्कादायक बाब म्हणजे, याच आरोपीने परिसरातील आणखी एका महिलेलाही ‘बंद झालेले विधवा निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करून देतो’ असे आमिष दाखवत प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केल्याचा खुलासा तक्रारीत करण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, सरकारी योजनांच्या नावाखाली महिलांची फसवणूक व छळ होण्याचे प्रकार वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असून, हा तपास पोलीस हवालदार प्रकाश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

i

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button