दिलीप सरकटे यांची पुन्हा बसपा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी निवड, जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अभिनंदन…!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी, रतन भगत.
(बुलढाणा) दि.२८/३/२०२६:-बहुजन समाज पार्टी जिल्हा बुलढाणा, बुलढाणा विश्रामगृह येथे मीटिंग पार पडली. प्रदेश सचिव माननीय पंडित जी बोर्डे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष दिलीप जी सरकटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा निहाय सर्कल व पंचायत समिती गणांचा अहवाल देण्यात आला. सदर मिटिंग मध्ये मलकापूर विधानसभे मलकापूर विधानसभेतर्फे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष श्री रवींद्र साठे व महासचिव प्रशांत इंगळे साहेब यांनी मलकापूर विधानसभेत सर्कल व पंचायत समिती गण अहवाल बहुजन समाज पार्टी सेक्टर फॉरमॅटवर लेखी स्वरुपात दिला. मलकापूर विधानसभा अध्यक्षपद घेऊन आठ महिन्याच्या कमी कालावधीत केलेले काम पाहून प्रदेश सचिव माननीय पंडित जी बोर्डे साहेब यांनी मलकापूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष शिवश्री रवींद्र साठे व महासचिव प्रशांत इंगळे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. सदर बैठकीमध्ये जिल्ह्यातील बहुजन समाज पार्टीचे अधिकृत पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये पुन्हा एकदा आदरणीय दिलीप जी सरकटे साहेब यांची त्यांनी केलेल्या बुलढाणा जिल्ह्यात कामाची दखल घेऊन बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा बसपा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. निश्चितच सरकटे साहेब हे जिल्ह्यातील बसपाचे मजबूत संघटन बांधण्यासाठी आपल्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन विधानसभा निहाय सर्कल व पंचायत समिती गणाचा नेहमी आढावा घेत आहेत……



