मोठी आनंदाची बातमी! रेल्वे प्रशासनाचा ऐतिहासिक निर्णय….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
शेगाव:- २९ मार्च २०२६
लोकमान्य टिळक टर्मिनस–बल्हारशाह एक्सप्रेसला शेगाव येथे थांबा मंजूर भाविक आणि प्रवाशांना मोठा दिलासा.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, गाडी क्रमांक १२२०९/१२२१० लोकमान्य टिळक टर्मिनस–बल्हारशाह एक्सप्रेसला शेगाव रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे हजारो भाविक व स्थानिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे विशेषतः श्री समाधानाचे वातावरण नाही, तर शेगाव आणि परिसरातील आर्थिक व सामाजिक विकासालाही गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.शेगाव हे विदर्भातील प्रमुख धार्मिक स्थळ असून येथे असलेल्या श्री गजानन महाराज मंदिर येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. आतापर्यंत या भाविकांना थेट रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता या एक्सप्रेसच्या थांब्यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सुरक्षित होणार आहे.
या निर्णयाबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचे सर्व स्तरातून आभार मानले जात आहेत. स्थानिक नागरिक, व्यापारी व भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या नव्या थांब्यामुळे केवळ धार्मिक पर्यटनालाच चालना मिळणार नाही, तर शेगाव आणि परिसरातील आर्थिक व सामाजिक विकासालाही गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे……✍️



