रावेर पोलीस स्टेशन ने केली कत्तलीकरिता जाणाऱ्या गाईंची सुटक
स्टार भारत लाईव्ह प्रतिनिधी
विकास आमोदकर
दिनांक 16/03/2026 रोजी सायंकाळी 18.50 वाजेचे सुमारास मध्य प्रदेश सेमीलगत असलेल्या शेडीया अंजन गावाकडुन पाल गावाकडे सुकीनदीचे पात्रातुन महाराष्ट्रात चोरट्या मार्गाने गाईना आरोपी नामे जहांगिर हसन तडवी, वय 36 वर्ष, रा. बोरव्हाल ता. झिरण्या जि. खरगोन (म.प्र.)हा गाईना काठीने जोरजोरात मारत अत्यंत निदर्यतेने त्यांना कुठल्याही चा-या पाण्याची सोय न करता क्रुरपणे भुकेल्या अवस्थेत घेवुन येत असल्याची माहिती मिळाल्याने मा.पोलीस निरीक्षक सो श्री डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जगदिश पाटील व कल्पेश आमोदकर पोलीस स्टाफ यांनी पाल गावातील कृषी विज्ञात केंद्राचे पुढे स्मशानभुमी जवळ सुकीनदी पात्रात 7 गाई किंमत अंदाजे 56000 ह्या कत्तल करण्याचे उद्देशाने घेवुन जात असल्याची खात्री झाल्याने त्यांची सुटका करण्यात आली असुन सदर गाई ह्या गोशाळेत दाखल करून आरोपीचा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस निरीक्षक सो. श्री डॉ. विशाल जयस्वाल सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोना कल्पेश आमोदकर हे तपास करीत आहे.
सदरची कारवाई माननीय श्री डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव माननीय श्री अशोक नखाते अपर पोलीस अधीक्षक जळगाव विभाग तसेच माननीय श्री अनिल बडगुजर पोलीस उपविभागीय अधिकारी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल पोलीस स्टेशन रावेर पोलीस पोलीस हवालदार जगदीश पाटील तसेच पोलीस नाईक कल्पेश आमोदकर यांनी केलेली आहे



