महाराष्ट्र

वरवट बकाल येथे 2 देशी कट्टे व चार जिवंत काढतुसह एक आरोपी ताब्यात.. बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा पथकाची तामगांव पोस्ट हद्दीत धडक कारवाई

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगाव जामोद

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या तामगाव पोलीस स्टेशन हद्दीत एका आरोपीकडून 2 देशी कट्टे व चार जिवंत काढतूस सह एकूण 84 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई आज दिनांक 4 नोव्हेंबर वरवट बकाल येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात नांदेड येथील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे एका आरोपीकडून 2 देशी कट्टे व चार जिवंत काढतूस असा एकूण 84 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये पवन वासुदेव कोकाटे वय 34 वर्ष राहणार नांदेड असे आरोपीचे नाव आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक बुलढाणा निलेश तांबे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड बुलढाणा, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा खामगाव, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांचे आदेशाने आज पोलीस स्टेशन तामगाव हद्दीत आर्म आक्ट ची कलम 3,25, खालील प्रमाणे कारवाही करण्यात आली. सदर कारवाई PSI पंकज सपकाळे, एजाज खान, अमोल शेजोळे, अजीज परसुवाले, शिवानंद हेलगे, यांच्या पथकाने कारवाई केली आहे. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन तामगांव येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तामगांव पोलीस स्टेशन करीत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button