जळगावा जिल्हारावेर

श्री व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेरच्या साबीर चव्हाण यांची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ज्युडो स्पर्धेसाठी निवड*

स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस

प्रतिनिधी विकास आमोदकर

रावेर : श्री व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेर येथील ज्युडोपटू साबीर अक्रम चव्हाण यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संघात अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ज्युडो (पुरुष) स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांच्या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.
भोपाल येथे झालेल्या साऊथ वेस्ट झोन आंतरविद्यापीठ ज्युडो स्पर्धेत दमदार कामगिरी करत साबीर चव्हाण यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर ६६ किलो वजन गटात अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ज्युडो स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
सदर स्पर्धा चंदीगड विद्यापीठ, मोहाली (पंजाब) येथे दि. १८ ते २२ मार्च २०२६ दरम्यान पार पडणार असून देशभरातील विविध विद्यापीठांचे उत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष हेमंतशेठ नाईक, संस्थेचे सदस्य डॉ. प्रतीक नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य प्रा. एस. यू. पाटील, डॉ. संदीप धापसे, तसेच क्रीडा समिती सदस्य प्रा. चतुर गाडे, प्रा. नरेंद्र घुले, प्रा. लालसिंग वळवी यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व क्रीडाप्रेमींनी खेळाडूचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सदर खेळाडूला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. उमेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button