बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

स्वतःला हिंदू म्हणून घेणाऱ्या स्त्रियांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायाचे पूजन केले पाहिजे!!! विक्रम गोखले यांचे वक्तव्य!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस, 

प्रतिनिधी संग्रामपूर,

रतन भगत. 


       स्वतःला हिंदू म्हणून घेणाऱ्या स्त्रियांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायाचे पूजन केले पाहिजे असे वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू मॅरेज कोड चा आग्रह धरला नसता तर हिंदू स्त्रियांचे काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही त्यामुळे स्वतःला हिंदू म्हणून घेणाऱ्या स्त्रियांनी रोज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायाचे पूजन केले पाहिजे असे वक्तव्य विक्रम गोखले यांनी स्पष्ट केले आहे. तसेच धर्मांतर करताना इस्लाम न स्वीकारल्याबद्दल हिंदूंनी कायम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऋण राहिले पाहिजे असे ते म्हणाले आहेत पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर वांग्मय वक्तृत्व स्पर्धा समितीच्या वतीने विक्रम गोखले यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले एखाद्या व्यक्तीला समाज पुरुष मानणे हा आपला सामाजिक दोष आहे एखाद्याला देवत्व देऊन आपण धन्य होतो मात्र ती ही माणसेच आहेत. त्यामुळे ती सुद्धा चुकू शकतात त्यांनी काय बोलणे काय करणे याचे स्मरण ठेवले पाहिजे. असे सुद्धा विक्रम गोखले यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. आपल्या संबोधित भाषणात ते पुढे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी खूप मोठ्या प्रमाणात हक्क व अधिकार दिलेले आहेत . त्यामुळे स्त्रिया ह्या आता कोणत्याही क्षेत्रामध्ये पुरुषाच्या तुलनेत नेहमीच आघाडीवर दिसत आहे. याचे कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली व्यक्ती स्वातंत्र्याच्या स्वरूपात फार मोठी अनमोल देणगी होय असे सुद्धा त्यांनी सांगितले. त्यामुळे हिंदू धर्मातील स्त्रियांनी किंवा इतर कोणते स्त्रियांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अवलोकन करावे आणि आपल्या जीवनाचा उद्धार करावा असे सुद्धा सांगितले....

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button