खानदेशबुलढाणामनोरंजनमहाराष्ट्रराजकीयविदर्भ

जळगाव जामोद चे आ. संजय कुटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा….

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

जळगाव जामोद:
दि. ९ मार्च :जळगाव आज मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिकांनी आमदार कुटे यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
आमदार संजय कुटे हे गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव जामोद मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असून ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सेवा तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे मतदारसंघात अनेक विकासकामे मार्गी लागली असून नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.
वाढदिवसानिमित्त विविध गावांमध्ये सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. काही ठिकाणी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण तसेच गरजू नागरिकांना मदत अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी केक कापून तसेच पुष्पगुच्छ देऊन आमदार कुटे यांचा वाढदिवस साजरा केला.
यावेळी उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांनी आमदार संजय कुटे यांना निरोगी आयुष्य लाभो व त्यांच्या हातून मतदारसंघाचा विकास अधिक वेगाने होवो, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच शिवाजी समाधान गावंडे व नमो बुद्धाय मित्र मंडळ हिंगणा कवठळ यांच्याकडून जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार श्री संजय श्रीराम कुठे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा……

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button